Sunday, March 20, 2016

इस्राईलचा फिनीक्सः बेत शान

इस्राईल बद्दल आधी बरच टंकलं.कितीही झालं फिरुन तरी या एवढ्याशा देशाबद्दल लिहायला काही कमतरता नाही.जेवढी निघेल तेवढी माहिती.नाविन्यता.आश्चर्य.खरोखर जसा चिन्यांचा देश अजब आणि अरभाट तसा हिब्र्युंचा देश चमत्कारीक आणि आशादायी.
'येशूचा आणि ज्युविश लोकांचा इतिहास सोडला तर इस्राईलचा असा काय खास इतिहास असणारे??'- आर्किओलॉजि (टूर)टूरचा मेल बघून मनात विचार आला. पण सोबत असलेली फोटोची अॅटॅचमेंट पाहून उत्सुकता जराशी वाढली, म्हणून करून टाकलं बूकिंग...
सोबत हवामानाची 'नोट' पण होती- उष्ण कोरडे ३०º से. च्या वर... मनात आलं रोज आपण १५º से. मधे कुडकुडतो ... तिथे एवढा काय फरक असणारे...???इथे पण स्वत:वर अती आत्मविश्वास दाखवून सोबत स्कार्फ, स्वेटरं, जर्कीन घेउन निघालो, बसजवळ पोहचल्यावर समजलं काही आमच्यापेक्षा ही आत्मविश्वासू लोकांनी पाउस येईल या भीतीने छत्र्या ही सोबत घेतलेल्या... म्हणलं.. 'छ्या!! आपण विसरलोच राव' अ ओ, आता काय करायचं . इस्राईलच्या हवामान खात्याचा चांगला अनुभव असूनही असल्या गोष्टी मनात... नाही नाही...डोक्यात येउन गेल्या. पण तिथे पोहचल्यावर हा 'overconfidence' चा फुगा जोरात फुटनार होता.
कॅमेर्याला आधीच बजावून ठेवलेला 'बाबा रे, आज तुला क्षणभरही उसंत नाही बरं का!'... ५-६ फोटो काढून त्याला trailer पण दाखवलेला…
जाताना मस्त हिरवीगार शेते लागली ...
हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणाच्या मखमालीचे... या ओळी ओठांवर खेळत होत्या...
12719279_1126926170665355_3808988850335459339_o.jpg
12748120_1126926207332018_1762219353492005062_o.jpg
12794795_1126926173998688_4100272055931974689_o.jpg
टूर होती माउंट गिल्बोआ डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या बेत शान-(beit she'an) शहराची... २-२.१५ तासांचा प्रवास पोहोचलो बाबा -बेत शान राष्ट्रीय उद्यानात... बस मधून उतरलो ते स्कर्फ्,मफरेल आणि जर्किन्स बसमध्ये ठेऊनच. ऊन मी म्हणत होतं. जगातल्या सर्वात ऊष्ण भागांपैकी एक भाग असणार बेत-शान.अंग तापलं होतं.उन्हाळा एवढा की तो टाळण्यासाठी उन्हाळ्यात इथली शेतकरी लोकं फक्त सकाळी आणि संध्याकाळी शेतात काम करतात.
12778883_1126926270665345_5035004048313375138_o.jpg
‘वसंत’असल्याने झाडांवरची फुले गोड हसत होती…
12764326_1126926347332004_7682152982844362117_o.jpg
सोन्या सारखी दिसणारी फुले पाहिली अन आठवला सप्टेंबरमधला सोनकीचा हरीश्चंद्रगडाचा सडा.
12794799_1126926483998657_6899219013186533753_o.jpg
12771646_1126926527331986_6305303309102850127_o.jpg
12771506_1126926410665331_1181332421430043125_o.jpg
आम्ही एका छोट्याशा डोंगरावर ऊभे आहोत आणि समोर दिसत होते,इजिप्शीयन गव्हर्नरच्या बंगल्याचे अवशेष होते.कोण कुठला बापडा इजिप्शियन गव्हर्नर...आला इकडे,केलं राज्य...बंगला बी बांधला..
10379741_1126926907331948_8546571728609940261_o.jpg
इतिहासाचं आणि आपलं नातं कायमच बेंच आणि झोपेचं राहिलंय.(काय सांगता.इतिहाच्या तासाला एकदा तरी झोपला होता असं स्वताशी तरी कबूल करा) ...
पण आमचा गाईड फारच उत्साही.शाहीराच्या आवेशात नसला तरी त्याची वाक्य त्याचं प्रभुत्व दाखवित होती.त्याचा त्याच्या कामावर असलेला विश्वास आणि आवडसुद्धा.
आता आमच्या या बोलघेवड्या गाइडने सांगितलेली गोष्ट अशी...
सफर करू उत्तर इस्राईलच्या इतिहासाची… एका २३ वेळा नष्ट होऊन पुन्हा पुन्हा बांधलेल्या साम्राज्याची...... गाईडचा 'टोन' एक सलग ऐकू येत होता आणि लांबलचक कांगदाची भेंडोळी सुटावी तसं भासत होतं. शहराची गोष्टच न्यारी...पडझडून उभं राहण्याची हिम्मत न्यारी...ढासळलेल्या विटांवर पाय देऊन हुंकारण्याची...आणि एक नव्हे,दोन नव्हे तब्बल तेवीस वेळा पाया ते कळस रचण्याची कमाल गोष्ट...
इस्राईल किती सहनशील आणि चिकाटीचं..!?
फार फार वर्षांपूर्वी- म्हणजे साधारण ५००० वर्षांपूर्वी ताम्रयुग सुरूवात होत असताना जॉर्डन नदीच्या काठी लोक राहायला आले. भरपूर पाण्याचा साठा आणि कसदार सुपिक जमिन असल्याने हे लोक डोंगरातल्या गुहेत राहु लागले. पोटापाण्यासाठी शेती करू लागले. चांगले बस्तान बसल्यावर तिथे त्यांनी एक गावच प्रस्थापित केले. त्या गावाचे नाव- बेत शान. नावाप्रमाणे शानदार असे हे गाव.पण काही वर्षांनी आगीत हे शहर भस्मसात झाले. आगीत त्यावेळी शहरं भस्मसात होत.उगाच शहरं कशी आगीत होरपळत असतील असा विचार आला.पण मग रोम आठवलं.म्हटलं असं आग लागणं युद्धनिष्पत्त असावं.
Canaanite/ Egyptian period
त्यानंतर ताम्रयुगाच्या मध्यंतरात १५ व्या शतकात, इजिप्शीयन राजा- तिसरा थुटमोस याने जोशिआ राजावर चढाई करून हा भाग जिंकून घेतला. त्याने हे शहर पुन्हा वसवले आणि नाव दिले-रेतेनु. पुढची ३५० वर्षे हा भाग इजिप्शीयन राजवटीकडेच राहीला. लोहयुगाच्या सुरूवातीच्या काळात हे त्यांचे प्रशासन केंद्र बनले.
Bibilical period
११ व्या शतकाच्या सुरूवातीला इस्रायली राजा साउल याने इजिप्शीयांवर आक्रमण केले.पण त्याला हे राज्य जिंकता आले नाही. या युद्धात साउल आणि त्याची ३ मुले मात्र मारली गेली. यात या शहराचे बरेच नुकसान झाले. १० व्या शतकात पुन्हा एका इस्रायली राजाने-डेविडने आक्रमण करून हा भाग जाळून टाकला. त्याचा मुलगा सोलोमन याने हे राज्य पुन्हा एकदा वसवले. हे प्रशासन केंद्र झाले. सोलोमनच्या मॄत्युनंतर यातला काही भूभाग पुन्हा एकदा इजिप्शीयनांकडे गेला आणि काही भूभाग असिरीयन लोकांनी जिंकून घेतला.
Helinistic period (Greek and Mediterranean)
ग्रीक पौराणिक कथांनुसार, तिसर्याू शतकात हे शहर द्योनिसॉस(god Dionysos) देवाने शोधले व पुन्हा एकदा वसवले. त्याला सांभाळणार्या आयाला इथे दफन केले म्हणून त्याने या शहराचे नामकरन "निसा"(Nysa) असे केले. तसेच ग्रीक इतिहासात काही ठीकाणी या शहराचा उल्लेख "सिथोपोलिस" (scythopolis) असा केला आहे.
दुसर्या शतकात ग्रीक राजवटीचे सर्वात मोठे शहर होते. पण हासमोनियन्सनी (एक जुनी इस्रायली राजवट) पुन्हा एकदा हे उद्ध्वस्त केले.
Roman period
ऱोमन काळात, साधारण पहिल्या शतकाच्या सुरुवातीला हे शहर प्रशासन केंद्र बनले. रोमन बांधणी नुसारया भागाची रचना केली. तेल या भागाच्या दक्षिण आणि पूर्व भागाकडून पुन्हा एकदा उभारणी झाली. पण एका मोठ्या भूकंप धक्क्यात हे शहर पुन्हा मोडून पडले.
Byzantine period
ख्रिस्त लोकांनी हे शहर उभारून इथला एरीया ४०० एकरनी वाढवला. लोकसंख्या ४०,००० झाली आणि शहराभोवती ४.५ किमीची भिंत उभारली गेली
Arab period
अरब काळात,६३६AD मध्ये शहराचे नामकरण झाले- बेइसन आणि उतरणीचा काळ सुरू झाला. नवीन राजानी लोकांच्या सहनशीलतेचा अंत बघून कठोरपणे राजवट सुरू ठेवली.एका मोठ्या भूकंपानंतर याचा अंत झाला.
Ottoman period (turkish empire)
पुन्हा काही सेनानींनी किल्ला बांधला, पण लवकरच तो जमीन दोस्त ही केला गेला... त्यानंतर बराच काळ बेइसन हे छोटेसे गाव राहिले.१३०८ मध्ये मात्र हे शहर इजिप्त कडून सिरीयाकडे केल्या जाणार्‍या औद्योगिक वाहतूकीचे केंद्र बनले.
१९४९ मध्ये सर्व राजवटींचा अंत होऊन- इस्राईलचा पहिला मेयर नोआ मर्डिंजर याने हे शहर पुन्हा उभे केले. तेच आजचे "बेत शान". अर्थात मधल्या काळात या भागावर विजय मिळवण्याचा खूप प्रयत्न झाला. असे २३ वेळा जमिनदोस्त झालेले हे साम्राज्य आज अनेक ऐतिहासिक खुणा घेऊन दिमाखात काळाची साक्ष देत ऊभे आहे.
तर हे रामायण- महाभारत का घडलं असावं??? तर बेत शानची भौगोलिक परिस्थिती- सी ऑफ गॅलिली, जॉर्डन नदी आणि इथली कसदार सुपीक जमीन… जॉर्डन रिवर व्हॅली आणि जेझराईल व्हॅली मध्ये वसलेले हे शहर.
आजही इजिप्त कडून सिरीयाकडे केली जाणारी वाहतूक याच मार्गाने केली जाते.
हीब्र्यु युनिवर्सिटी आणि पेनसिल्व्हानिया युनिवर्सिटी मध्ये इथल्या आर्कीओलॉजीचा अभ्यास सुरू आहे.
गव्हर्नरच्या बंगल्याच्या पुढे गेल्यावर डोंगरावरून दिसणारा हा व्हियु-
12779249_1126927063998599_3655081984440921541_o.jpg
12794661_1126927047331934_4746406418735826846_o.jpg
नॅशनल पार्कच्या जवळ असलेल्या कॅफेटेरीयाजवळ असलेली ही रोमन साम्राज्याची प्रतीकृती
12794788_1126928013998504_8105170288829195435_o.jpg
12764353_1126928027331836_2762713039074461312_o.jpg
पॅलॅडीयस स्ट्रीट
12792118_1126927700665202_8463365749081473734_o.jpg
12792337_1126927957331843_737512646927905799_o.jpg
ग्रीक पुराणात उल्लेख असलेल्या द्योनिसोस देवाच्या मंदिराचे हे काही अवशेष...
12418935_1126927917331847_3488975942979072338_o.jpg
11694936_1126927793998526_8241153593589483619_n.jpg
12800104_1126927797331859_8594805874384843403_n.jpg
पॅलॅडीयस स्ट्रीटच्या नैऋत्येला असलेले रोमन काळातील स्नानगॄह. इथे काही संगमरवरी फरशांचा वापर केला आहे
12768134_1126928173998488_1683319226866814034_o.jpg
12768338_1126928350665137_3295243740922893394_o.jpg
इथे २ उबदार असे हॉल्स आहेत. जमिनीखालून गरम हवेने पाणी गरम करण्याच्या रोमन प्रणालीचा वापर केला जात असे (hypocaust method).
12778887_1126928223998483_9056168127412480649_o.jpg
12790905_1126928170665155_3578637815156513262_n.jpg
तर या आंघोळीसाठी लागणार्यास अक्सेसरीज्... पेडिक्युअर -मॅनिक्युअर ई.
12783654_1126928300665142_8808096682061897013_o.jpg
12794740_1126928180665154_4264335331515733133_o.jpg
हे काय असेल असे वाटते???
रोमन काळातील सार्वजनिक शौचालय... अर्थात अवशेष...
सो कमोड स्टाईल जरी ओल्ड असली तरी सगळ्यांनी कसरत करत बसून बघितलच आणि हौस म्हणून गाईडकडून फोटोही काढून घेतले खो खो
तर ही श्रींमंतांची स्वच्छतागृहे... खास टर्कीवरून मागवलेल्या संगमरवराचा वापर इथे केला आहे...
12718367_1126928607331778_8275893005317482403_n.jpg
12771944_1126928623998443_2359371623552733814_o.jpg
हे अर्धगोलाकार रोमन काळातील शॉपिंग मॉल...
12764698_1126928457331793_4431898657600532132_o.jpg
ही काही दुकाने आणि आतील रचना... पण हे स्नान गृहाला जोडून होतं, ते का ते नाही बुवा समजलं
12783596_1126928527331786_5452748210413304096_o.jpg
12764419_1126928427331796_7993682678924156130_o.jpg
हे थिएटर सुमारे १ AD च्या सुरूवातिला बांधले गेले. इथे ७००० सीट्स होत्या, डोंगराचा काही भाग वापरून हे थिएटर बांधले आहे. स्टेजसाठी जे खांब आहेत त्यासाठी ग्रॅनाईट वापरले आहे.
12698341_1126928753998430_1838112674437533459_o.jpg
12764348_1126928797331759_5501846980493294666_o.jpg
12764582_1126928830665089_2352788950755134544_o.jpg
12799073_1126928700665102_1789434557587333207_n.jpg
प्रार्थनास्थळी पूजेच्या विधीसाठी लागणारे पाणी इथे साठवले जायचे. रोमन काळातील शहररचनेमधील हा एक महत्वाचा भाग
12768155_1126928603998445_3340799738621495118_o.jpg
इस्राईल आपण पाहतो ते लांबून....मानलं पाहिजे या इस्रायली लोकांना, जिथे जाईल तिथे नवीन गोष्ट बघायला मिळते.चिन्यांसारखे मिचमिचे डोळे यांच्या कडे नसतील तरी दूरदृष्टी आणि तिक्ष्ण विचार याचा मिलाफ असलेल्या देशात मला रहायला मिळाल याबद्दल आयुष्याचे आभारच मानायला हवेत.

Tuesday, March 1, 2016

इस्राईलच्या पुण्यभूमीत

इस्राईलला येऊन महिनाच झालेला. पुढच्या महिन्यात आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस.कसा साजरा करावा,यावर बर्र्च काथ्याकूट झाल्यावर ठरलं- 'जेरुसलेम'!!!
वास्तविक धार्मिक स्थळ आणि लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्याचं ठिकाण हा विरोधाभास इंडियाबाहेर असल्यामुळे सुटला. (युद्ध सुरु झालं होतं. युद्धजन्य परीस्थितीत तिथे जावं की नको यावरही परत ‘समित्या’ डोळा मारा नेमल्या). फारसं डिबेटींग न होता,सहकार्यांनी चांगली कल्पना म्हणून ग्रीन सिग्नल दिला. खूपशी माहिती पण दिली. बस, ट्राम अशी सगळी माहिती काढली. अगदीच तत-पप होउ नये म्हणून थोडे हिब्र्यु शब्द आणि तिकीट वगैरे काढताना लागतील म्हणून अंक पण शिकून घेतले. जेरुसलेम हे मोठे शहर एका दिवसात फिरुन होणार नाही म्हणून जुने शहर फक्त निवडले. धार्मिक स्थळांना प्रॉपर पर्यटन केंद्र कसं बनवावं हे बाहेरच्या देशांकडून शिकावं.
जेरुसलेमला सिटीमध्ये फिरायला ट्राम आहेत. त्या ट्राममधून आखिवरेखिव शहर भारी दिसतं. उंच भिंतींच्या आत वसलेलं हे जुनं शहर, सुंदर बांधिव रस्ते आणि अधुनमधून दिसणारी हिरवळ. सारंच न्यारं रुप येशू च्या गावाचं.
मेन गेट (जाफा गेट)कडे जायचा रस्ता...
1240036_832193476805294_955534209781437931_n.jpg
10561756_832193386805303_8417447468750256730_n.jpg
995611_832193216805320_6855898485670463838_n.jpg
या मोठठ्या भिंतीच्या मागे एवढी रंगीबेरंगी दुनिया असेल असं वाटल सुद्धा नव्हतं…इथे एकूण चार भाग आहेत- मुस्लिम क्वार्टर, ख्रिश्चन क्वार्टर, अर्मेनियन क्वार्टर आणि ज्युविश क्वार्टर. या प्रत्येक भागात, घरे, दुकाने, इमारती यांच्या बांधणीतून त्या त्या संस्कृतीचे दर्शन होते.
आत गेल्या गेल्या एक information centre लागले. तिथे आम्हाला असा एक नकाशा मिळाला आणि आम्हाला हवी ती बेसिक माहिती मिळाली.
हा जुन्या जेरुसलेमचा नकाशा
114091E_Jerusalem.jpg
इथे जे मेन गेट आहे त्याला जाफा गेट म्हणतात. त्या भल्या मोठया दरवाजातून आत गेल्यावर पहिल्यांदा अर्मेनियन क्वार्टर लागते तिथे दाराशीच एक टॉवर आहे ज्याला david's tower म्हणतात. या टॉवरवरून जुन्या सिटीचा मस्त व्ह्यु दिसतो. इथून आत गेल्यावर छोट्या गल्ल्या लागतात.
David's tower
07-2-6.TowerDavid.jpg
इन भुलभुल्लैया गलियों मे अपना भी कोई एक घर होगा,
अंबर पे खुलेगी खिडकी या खिडकी पे खुला अंबर होगा...
12519_832192386805403_720691336766723062_n.jpg
तिथून आम्ही ज्युविश क्वर्टर कडे गेलो. इथे आहे जेरुसलेमचं सगळ्यात मोठठं आकर्षण- western wall, इच्छापूर्ती भिंत! इथे जे मागितलं जात ते मिळतं असं म्हणतात, इतकचं नाही तर लोक आपली दु:खं या वेलिंग वॉल जवळ मांडतात.
इच्छापूर्ती भिंत
10628030_832193076805334_5276276172232507009_n.jpg
हा त्याच्या समोरचा भाग…इथे खूप वेगवेगळी म्युझियम्स आहेत.
10565116_832192906805351_4798527803827470907_n.jpg
टेंपल माउंट
हे ज्युंचे पवित्र स्थान मानले जाते. याला हाराम असं म्हणतात. हे ४ धर्मांनी बनले आहे- ज्युडाइसम, ग्रेकोरोमन पॅगानिसम, इस्लाम आणि ख्रिश्चन.
Dome of the rock
हे मुस्लिम पवित्र ठीकाण असून हे टेंपल मॉउंटमध्ये वसवले आहे. ही इस्राइलची एक ओळख मानली जाते.
सगळ्या मोठ्या इमारतींमध्ये ही सोनेरी मुकुट घातलेली निळ्या पांढर्‍या रंगाची सुंदर इमारत अगदी उठून दिसते.
10590476_832192736805368_2852988830161690384_n.jpg
10386808_832192616805380_6781661124483672655_n.jpg
अल-अक्सा
ही अल-अक्सा, एक खूप जुनी प्रसिद्ध मस्जिद आहे. इथे आजूबाजूला अनेक इस्लामीक गट प्रार्थना करत बसलेले असतात.
10625013_832192826805359_6497422186017798518_n.jpg
Austrian hospice
मग आम्ही जेरुसलेमच्या सगळ्यात जुन्या गेस्ट हाउस वर गेलो. Austrian hospice- हे जुन्या सिटीच्या बरोबर मध्यभागी आहे. ही पर्यटकांना राहण्यासाठी केलेली सोय आहे पण इथे बरेच लोक फोटो काढण्यासाठी येतात. जुन्या शहराचा टॉप व्ह्यु खासच दिसतो
इथे आम्ही काढलेली काही प्रचि.
10570560_832192353472073_3801040127947301677_n.jpg
1604598_832193523471956_8221280927329605137_n.jpg
मग आम्ही ख्रिश्चन क्वार्टर्स मधे आलो. भारतातून येताना आमच्या ख्रिश्चन शेजार्यानी इथे एकदा जाउन येच असे सांगितले होते. ही ती जागा जिथे येशू ख्रिस्ताना क्रूसावर चढवलं गेलं.
व्हाया डोलोरोसा मार्ग (via dolorosa street)
या रस्त्यावरून येशूंना चालवत नेलं, ते जिथे थांबले तिथे एक थांबा(station) बनवला, असे एकूण १४ थांबे आहेत. हे सगळे थांबे मिळून व्हाया डोलोरोसा (via dolorosa street) रस्ता तयार झाला.
jerusalem-via-dolorosa-map.jpg
10565235_832192570138718_2315430037518796083_n.jpg
5126139434_5272cddfb8_z.jpg
सेंट वेरोनिका चर्च
हे सेंट वेरोनिका चर्च
ही तीच वेरोनिका, जीने डोलोरोसा वरून मार्च सुरु असताना येशूंचा चेहरा रूमालाने पुसला. तिचा तो रूमालही veil of veronica म्हणून प्रसिद्ध आहे.
10418999_832192443472064_2081762239932086992_n.jpg
होली सेपल्चर चर्च (Church of the Holy Sepulchre)
इथे ख्रिस्तांना क्रूसावर दिलं गेलं. हे दोन जागांसाठी प्रसिद्ध आहे-
काल्व्हेरी (calvary/Golgotha)- येशूना क्रूसावर दिलं ती जागा
आणि येशूचे रिकामे थडगे ( Jesus's empty tomb)- जिथे त्यांना पुरले गेले ,पण येशूंचा जन्म पुन्हा झाला असे मानले जाते म्हणून याला रिकामे थडगे म्हणतात.
10593142_832191596805482_415850113932617803_n.jpg
हे भव्यदिव्य चर्च पाहाताना डोळे दिपून जातात. भिंतींवर बरीच रंगीत चित्रे रेखटली आहेत आणि त्यावर लावलेले जुन्या पद्धतीचे दिवे अजुनच सुंदर दिसतात.
10599173_832190113472297_1761058246015730952_n.jpg
10386747_832190083472300_2285373847656329085_n.jpg
10624668_832193700138605_736817584392463482_n.jpg
10462541_832190180138957_1750390594693333453_n.jpg
10569091_832193616805280_3833154174077817834_n.jpg
इस्राईल मध्ये खूप कमी जागा पाहण्यासारख्या आहेत. पण त्या प्रत्येक जागेची एक वैशिष्ट्य पूर्ण गोष्ट आहे. ती गोष्ट समजल्यावर तिथे जाउन आल्याचे अधिक समाधान वाटते.