Thursday, January 28, 2016

बीट बीट बीट....बीट है वंडरफुल...!!!

एकदा बाजारात ताजे-ताजे बीट आवडले म्हणून घेतले. घरी येईपर्यंत बरेच कल्पनांचे इमले बांधून झालेले, वेगवेगळ्या आकाराचे बीट डिशमध्ये दिसत होते... मग घरी आल्यावर आनंदाने ते फ्रीजमध्ये ठेवले. जसा आठवडा सुरु झाला तसे बीट महाशय डोक्यातून बाहेर गेले, पण फ्रीजमध्ये बिचारे गारठून गेलेले. अरेरे
४-५ दिवसांनी अचानक आठवण झाली. बाहेर काढून बघते तर, ते बिचारे केविलवाणे माझ्याकडे बघत होते... पटपट साल काढून ताटात वाढले पण पतीराजानी कशीबशी एक फोड संपवली... राग
आता काय करायचे!! पुन्हा प्रश्न???
मग गूगल महाराजाना साद घातली... साध्या कोशिंबीरीत बरेच बदल आणि काही प्रयोग केल्यावर ही डिश तयार झाली...
आमच्या घरातल्या बीटाने असा आकार घेतला. जी आमच्या घरात नंबर एकची मागणी असलेली डीश आहे
बीट रायतं
लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 
१ मध्यम आकाराचे बीट
१ कप दही
३ चमचे साखर(दह्याच्या आंबटपणा नुसार)
१/२ चमचा मीठ
तेल
फोडणीसाठी:
१-२ लाल किंवा हिरव्या मिरच्या
कडीपत्ता
मोहरी
जीरे
हिंग
क्रमवार पाककृती: 
- प्रथम बीट स्वच्छ धुवून, साल काढून किसून घ्यावे.
- कढईत २ चमचे तेल तापवून, किसलेले बीट त्यात टाकावे. २-३मिनिटे छान भाजावे.
- त्यात १ कप पाणी घालुन शिजवावे. बीट शिजून कोरडे झाल्यावर गॅस बंद करावा व गार करावे.
- थोडे गार झाल्यावर बाऊल मधे काढून त्यात दही घालावे.
- त्यात चवीनुसार साखर आणि मीठ घालावे.
- वर १-२ लाल किंवा हिरव्या मिरच्या, कडीपत्ता, मोहरी-जीरे, हिंगाची फोडणी द्यावी.
- फ्रीजमधे थंड करून खायला घ्यावे.
वाढणी/प्रमाण: 
साधारण २-३ माणसांना
अधिक टिपा: 
- शिजवताना बीटात पाणी राहू देउ नये. साखर आणि मीठामुळे पुरेसा पातळपणा येतो.
- कोथिंबीर घालू शकता.
- दह्याचे प्रमाण जास्त असले तरी चालेल, छान बेबी पिंक कलर येतो.
माहितीचा स्रोत:
माझे प्रयोग
10686861_900779923279982_8023181879388578654_n_0.jpg

ब्रिगादेरॉ डेलिसीओसो

ब्रिगादेरॉ (brigadeiro)- एक ब्राझिलीयन डेझर्ट
मी हे एका इंटरनॅशनल पार्टी मध्ये खाल्लं होतं. आवडलं म्हणून मैत्रिणी कडून लगेच पाकृ मागून घेतली. ही एक पारंपारीक ब्राझिलीयन डिश आहे.
10898121_911673425523965_2242744974657316843_n.jpg
लागणारा वेळ: 
७-८ तास
लागणारे जिन्नस:
१ कॅन कन्डेन्सड मिल्क
१ कप Sour cream
३ अंडी
१ कप कोको पावडर
१/२ कप साखर (आवडीनुसार)
१००ग्रॅम मार्गारीन/ बटर
कलरफुल किंवा चॉकलेट स्प्रिंकल्स
इतर साहित्यः
केकचे भांडे किंवा microwave compatible भांडे
क्रमवार पाककृती: 
- सर्व जिन्नस एकत्र करुन ब्लेंडरमध्ये मिक्स करुन घ्यावेत
- भांड्याला आतून बटर/ मार्गारीन लावा.
-१०-१२ मिनीटे मायक्रोवेव मधे medium power वर ठेवा.
- थोडे थंड झाल्यावर त्यावर स्प्रिंकल्स पसरुन, फ्रीजमध्ये ७-८ तास ठेवा.
- केक सारखे तुकडे करुन सर्व करा.
वाढणी/ प्रमाण
साधारण ७-८ माणसांना
अधिक टिपा:
- असेही करु शकतो-मिश्रण थंड झाल्यावर ६-७ तास फ्रीजमध्ये ठेवा आणि त्याचे हवे त्या आकाराचे बॉल्स बनवून स्प्रिंकल्स मध्ये घोळवुन सर्व करावेत. लहान मुलांच्या पार्टी साठी छान.
- स्प्रिंकल्स म्हणून सुके खोबरेही वापरु शकता.
- इथे गोड Sour cream मिळते ते मी वापरले आणि साखर कमी घातली.
माहितीचा स्रोत: 
ब्राझिलीयन मैत्रिण स्मित
10906018_911673475523960_397868672995398087_n.jpg

Tuesday, January 26, 2016

ये हसी वादियाँ,ये खुला आसमाँ... -नेगेव, इस्राईल

ये हसी वादियाँ,ये खुला आसमाँ... -नेगेव, इस्राईल


घरातून निघतानाच जरा धाकधूक वाटत होती.ट्रिपला निघायचं तर पाऊस थांबलेलाच हवा. मागचा पूर्ण आठवडा सलग पाऊस पडत होता. माझ्या एका सहकार्‍याने सांगितलही होतं,या वर्षीचा पाऊस वेळ काळ पाहून आलेला नाही. उत्तर इस्राईल मध्ये काही ठिकाणी पूरही आलेला. पण आमचा दौरा दक्षिणेकडचा होता...बरंच म्हणायचं...पावसाच्या निरुत्साही वातावरणातून बाहेर पडायला आमच्यासोबत ३० जण तयारच होते...
सकाळचं वातावरण 'कूल' होतं. गारठा होताच, पण बोचरी म्हणावी अशी हवा निदान नव्हती...पण आम्ही चाललो तरी कुठे होतो म्हणा... ज्या वातावरणात आता होतो त्याच्या विरुद्ध...कृषीभूमीच्या वैराण आणि उजाड वाळवंटात...म्हणजेच नेगेवला... सकाळी ८ वा. आम्ही दक्षिणेकडे कूच केली. सोबत गाईड्, आमचे देशी-विदेशी संशोधक मावळे आणि रसदेसह बस असा सगळा लवाजमा होता. काही टूरीस्टपण होते. ९ वाजेपर्यंत ढगाआड लपलेल्या 'सुर्व्या' ने डोकावून पाहिलं... हुश्श... पंधरा दिवसांनी त्याचा लख्ख चेहरा दिसल्यावर काय छान फिल आला.
काले मेघा काले मेघा...
12186440_1064758513548788_685885541761649048_o.jpg
थांबून एके ठिकाणी ब्रंच घेतलं...आज सगळ्यांनी काम बाजूला ठेवलेलं...बस-टूरमधला पेटंट गेम अंताक्षरी मनात आलं तरी खेळू शकलो नाही... देश वेगळे... भाषा वेगळी...गाणी नाही पण गप्पा सुरु होत्या.
नेगेव चा मूळ अर्थ हिब्र्युमध्ये 'कोरडा" असा होतो, शिवाय 'दक्षिण' असाही अर्थ आहे (इति आमचा गाईड)...गाईडचाच उत्साह पोतंभर. सगळे व्हिसीटींग सायंटीस्ट आणि परदेशस्थ आहेत म्हटल्यावर त्याने पण त्याचा डोक्यातला गूगलबाबा फुल स्पीडने प्ले केला. रस्ता तसा विराण होता. हळूहळू पिवळसर लॅटेराईटची मैदानं दिसू लागली. वार्‍यासोबत भुरभुरणारी माती आणि बुटूकबैंगण काटेरी झुडपं म्हणजे नेगेवची सुरुवात.
12183775_1064758516882121_7891352517094512604_o.jpg
नेगेवला गेलं की, छोटी बसक्या पद्धतीची घरं दिसतात. एक घर दुसर्‍या पासून काही ठराविक अंतरावर. प्रत्येक घराच्या अंगणात गवताचेभारे,शेळ्या-मेंढ्या,लाकडं वगैरे...! ही मालमत्ता होती 'बेडॉईन्स'ची...एक वाळवंटी अरब-सिरीयन भटकी जमात. सतत जागा बदलणारे. याच ठिकाणी इस्राईलची भूदलप्रशिक्षण संस्था आहे. इस्राईलचं सैन्य जगात भारी का ते इथे येऊन बघा. अशा रफ-ट्फ वातावरणात प्रशिक्षण मग आणखी काय निपजणार…
20151030_095051.jpg
पुढे लागतो तो हा अन अविदात राष्ट्रीय उद्यानाचा भाग. (En Avedat National Park)
12182444_1064758520215454_2304846453313453856_o.jpg
बियर ग्रील चँलेंज पाहता ना...?त्यात त्याचं एक वाक्य असतं. अशा भागात पाऊस जरा जरी पडला तरी मोठा पूर येतो. अशा जागांवर फार वेळ थांबू नका वगैरे...त्याची प्रचिती. आदल्या दिवशी येऊन गेलेल्या पुराच्या खुणा. वाळूमध्ये पाणी लगेच जिरुन जातं.
12189514_1064758556882117_840069442500635293_o.jpg
Nubian Ibex :
वाळवंटी भागात आढळणारी शेळी. आठवण आली ती आपल्या निलगीरी तहर ची.
12185542_1064758826882090_1489445781865645261_o (1).jpg
ये हसी वादियाँ,ये खुला आसमाँ... चपखल बसत होतं गाणं...
12186341_1064758573548782_6530255368242895426_o.jpg
12183775_1064758596882113_1226140992784606366_o.jpg
या वैराण वाळवंटात हा सुरेख पाण्याचा झरा व त्याचा धबधबा. पाण्यातील सुंदर प्रतिबिंबांची दृश्य.
12192007_1064758736882099_6097177555317953578_n.jpg
12189290_1064758710215435_2155337820564051981_o.jpg
12188973_1064758626882110_2017575300880629112_n.jpg
10984120_1064758766882096_1524591107221377278_n.jpg
दोन डोंगरांमधून गेलेला ओढा. अत्यंत खारट पाणी आणि याच पाण्यावर वाढणारी झाडे इथे दिसतात.
12186651_1064758833548756_3603867536703836443_o (1).jpg
हायकिंगसाठी अरुंद पायर्‍या पाडलेल्या आहेत.या चढता येतात मात्र उतरता येत नाहीत. माथ्यावर असलेल्या वाहनतळापासून गाड्यांची सोय आहे.
12188018_1064758850215421_6174592399187033307_o.jpg
12188237_1064758900215416_6227993522634348041_o.jpg
11056625_1064758870215419_8496572632669066696_o.jpg
अगदी वरून घेतलेला एक टॉप-स्नॅप
12185028_1064758906882082_5348732204808741732_o.jpg
12039496_1064758956882077_8236519737250847283_n.jpg
12182986_1064758980215408_4999574264457190256_o.jpg
आमची पुढची भेट होती मिड्रेशेत, डेव्हिड बेन गुरीऑन यांच्या थडग्याला. इस्राईलची स्थापना ज्यांनी केली आणि याच देशाचे पहिले पंतप्रधान. आज ते असते तर इस्राईलचा, तिथल्या लोकांचा त्यांना निश्चितच खणखणीत अभिमान वाटला असता. मी कधी तुलना करीत नाही पण उगाच भारत आठवतो अशा वेळी. जेरुसलेमसारखी पुण्यभूमी सोडून 'मला नेगेवच्याच मातीत जमा होऊ द्या' म्हणणारे गुरीऑन. अब्राहम लिंकन, महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला या तीन महान व्यक्तींचा त्यांनी कायमच आदर्श ठेवला. शेजारीच त्यांची पत्नी पॉलाचीही समाधी आहे. याच भागात सोलार एनर्जी रिसर्च सेंटर आणि अॅग्री-बायोटेक रिसर्च सेंटर आहे. इवल्याशा इस्राईलमध्ये आणखी काय काय बघायला मिळणार याची लांबलचक यादीच बनते.
10382277_1064759096882063_980488676115127205_o.jpg
11224325_1064759106882062_1443860847886448067_o.jpg
12189263_1064759073548732_5389839470928428855_o.jpg
वाळवंटातील सुंदर शहर
सौरऊर्जेचा भरपूर वापर इथे केला जातो. भुसभूशीत भागात केलेले हायवे आणि टिकाऊ रस्तेपण.
12184092_1064759170215389_8402706563590356573_o.jpg
सर्वात मोठे विवर (crater)-
जगात अशी सहा विवरे आहेत पैकी पाच इस्राईल मध्ये असून एक इजिप्त मध्ये आहे. इथे हिब्र्यू मध्ये यालाच 'माखतेश' असं म्हणलं जातं. आजुबाजूचे डोंगर चुनखडी आणि मधली जमीन वाळू पासूनच्या खडकाने बनलेली आहे. भूगोलात आपण भूरूपे आणि त्यांचे क्षरण शिकलो. इथल्या कमी पावसाने आणि जोराच्या वादळवार्‍यानी इथे वळ्या-वळ्यांची कलाकुसर करुन ठेवली आहे. खनिज आणि सुर्यप्रकाशात त्यांचे मनमोहक रंग दिसतात.
12182403_1064759180215388_1610417309676445431_o.jpg
थोडी मौज-मजा
जवळच थांबलेली बस... ड्रायव्हरला पेनांचा नाद असावा.
त्याचं हे पेनाळं.
Desktop.jpg
माखतेश च्या शेवटी एक नदी आहे. त्याभोवती वाढलेली अकॅशियाची झुडपं. हा आमच्या हाईकचा शेवटचा टप्पा.
12196278_1064759243548715_5558052280338655014_n.jpg

12191237_1064759256882047_500637818890455694_o.jpg
ही बिळं बहुदा कृदंतवर्गीय प्राण्याची असावीत.एखादवेळेस नेगेव श्र्यू किंवा उंदीर. झुड्पाखाली ओलावा-थंडावा असतो म्हणून त्याखाली हे 'लोक्स' घरं करतात. अशी बरीच बिळं तिथे होती बहुधा. खाली जाळं असावं. समोरच सँड स्पायडरचा 'मौत का कुआ' दिसतोय. या गोलाकार वाळूच्या विहिरीत किडा पडला की फसतो. जितका बाहेर पडायचा प्रयत्न करेल तेवढी वाळू त्याला 'ट्रॅप' करुन ठेवते. शिकार मिळालीच म्हणून समजा.
887436_1064759313548708_4528476850617455161_o.jpg
कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा...
अशी सुरेख संस्मरणीय संध्याकाळ. थकवा कसा उरेल ब्वा.
887426_1064759330215373_6245200610725821847_o.jpg
त्या सुंदर जागेचा निरोप घेऊन परत उत्तरेला निघालो. नेगेव आठवणीत राहणार होतं.